ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराला आणि मेंदूला सुरळीतपणे कार्य करण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ ची आवश्यकता असते. याची कमतरता असल्यास शरीर वेळीच संकेत देत असतं. ही लक्षणे कोणती, जाणून घ्या.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि सतत थकवा जाणवतो.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील लाल पेशी कमी होतात. आणि अॅनिमियाचा त्रास जाणवू शकतो.
जर तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हे व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
व्हिटॅमिन बी १२ चा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील होतो. यामुळे मूड स्विंग्स किंवा डिप्रेशन होऊ शकतो.
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पोटाशी संबधित आजार जसे की, गॅस, ब्लोटिंग, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.