ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाला आहे, दिवसेदिवस तापमान वाढतंय. आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
उन्हाळ्यात काही लोकांना रात्री आंघोळ करून झोपण्याची सवय असते. काहींच्या मते, रात्री आंघोळ केल्यानंतर शरीर थंड होते आणि चांगली झोप येते.
रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो आणि शरीर ताजेतवाने होते.
रात्री आंघोळ केल्याने ताण कमी होऊ शकतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.
परंतु,रात्री आंघोळ करणे काही लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.
आंघोळ केल्यानंतर लगेच झोपल्याने काही लोकांना थकवा जाणवू शकतो. तर थंड पाण्याने आंघोळ केल्यानेही झोपेचा त्रास होऊ शकतो.
रात्री आंघोळ नंतर झोपणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट, हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असते.