ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेही रुग्णांनी चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. परंतु ते हर्बल टी किंवा विना साखरेचा चहा पिऊ शकतात.
मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आरोग्यानुसार चहाचे प्रमाण निश्चित करावे. पण चहा प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते का, जाणून घ्या.
मधुमेही रुग्णांनी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. कारण यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते आणि डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो.
गुळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गुळाचा चहा प्यायल्याने देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
हर्बल टी जसे की, हिबिस्कस टी, दालचिनी टी आणि हळदी टी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
अतिप्रमाणात चहा पिणे हे कोणत्याही निरोगी व्यक्तीसाठी हानिकारक असू शकते. त्यातच जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल, तर चहापासून दूर राहा.
मधुमेही रुग्ण सकाळी कोरा चहा पिऊ शकतात. तसेच विना साखरेचा चहा देखील पिऊ शकतात.