Surabhi Jayashree Jagdish
शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची शक्यता असते.
कोलेस्ट्रॉल वाढलं की परिस्थती आणखी गंभीर होते ज्यामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.
चुकूनही त्याची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये थोडासा निळापणा दिसला तर ताबडतोब तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी तपासली पाहिजे.
रात्रीच्या वेळी पायांमध्ये वेदना किंवा क्रॅम्प्स येणं हे देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकते.
पायांच्या बोटांमध्ये अचानक जळजळ होणं हे पायांमध्ये सामान्य रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे होते, ज्यामुळे पायांच्या नसांना नुकसान होतं.
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होऊ शकतो आणि यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि पाय सुन्न होतात.
जर तळवे आणि पायांमध्ये जखम असेल जी बरी होत नसेल, तर ती उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील असू शकते.
जर तळवे नेहमीच थंड असतील, तर ही उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.