Sakshi Sunil Jadhav
पावसाळा हा पर्यटन हवा हवासा वाटणारा सिजन असतो. या काळात मोठ्या संख्येने पर्यटन करायला घराबाहेर पडतात.
पुढील माहितीत आपण, स्वित्झर्लंडलाही विसरायला लावेल अशा ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत.
भंडारदऱ्यातले हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि शांत तलाव पाहून स्वित्झरलँडची आठवण तुम्हाला नक्कीच येईल. जुलैमध्ये इथले निसर्ग सर्वात जास्त खुलून दिसतो.
भंडारदऱ्यापासून काही अंतरावर असलेला रंधा धबधबा पावसाळ्यात प्रचंड वेगाने कोसळतो. धुक्याच्या वातावरणामुळे पर्यटकांना वेगळाच आणि छान अनुभव मिळतो.
भंडारदऱ्यातला आर्थर लेक शांत आणि रमणीय वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. बोटिंग आणि सूर्योदय-सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासाठी हे ठिकाण बेस्ट मानलं जातं.
महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर असलेलं कळसुबाई ट्रेकर्ससाठी आकर्षण आहे. पावसाळ्यात ढग, हिरवाई आणि थंड वातावरणामुळे इथलं सौंदर्य जास्त खुलतं.
अमृतेश्वर मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर सुंदर दगडी शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सान्निध्यात धार्मिक आणि ऐतिहासिक अनुभव घेता येतो.
भंडारदऱ्याजवळील हरिश्चंद्रगड ट्रेकिंग प्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो. कोकणकडा आणि ढगांमधील नजारे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
'व्हॅली ऑफ शॅडोज' म्हणून ओळखली जाणारी सांदण व्हॅली साहसी पर्यटकांसाठी खास आहे. उंच कडे, दऱ्या आणि पावसाळ्यातले निसर्ग मन मोहून टाकतो.