Shreya Maskar
सध्या स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशात आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे. यामुळे संसर्ग आणि रोग निर्माण करणारे विषाणू, जीवाणू आणि इतर आजारांशी लढण्यास ताकद मिळते.
पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका बळावतो अशा वेळी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी काही हेल्दी ज्यूस मदत करतात. ज्यांचा तुम्ही डाएटमध्ये आताच समावेश करा.
एका पॅनमध्ये पाणी आणि आल्याचा तुकडा टाकून चांगले उकळवा. पाणी गाळून घ्या आणि थोडे थंड होऊ द्या. नंतर, त्यात १-२ चमचे मध घालून प्या. हे पेय पांढऱ्या रक्तपेशींचे रक्ताभिसरण उत्तेजित करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाह-विरोधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गाचा धोका कमी करतात.
एका पॅनमध्ये अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर मीठ आणि काळी मिरी घालून उकळा. हे पेय थोडे थंड झाल्यावर प्या. हे पेय हंगामी संसर्गापासून वाचवतील.
ग्रीन टीमध्ये EGCG, पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यातील घटक शरीराला वाईट जीवाणूंपासून वाचवतात. तुम्ही सकाळी अर्ध्या लिंबाचा रस मिसळून ग्रीन टी पिऊ शकता. यामुळे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला आधार मिळेल.
आल्यामध्ये दाहशामक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. चिमूटभर काळी मिरी घातल्याने हळदीमधील 'कुरक्युमिन' या सक्रिय घटकाचे शरीरातील शोषण सुधारते. त्यामुळे अर्धा कप हळद-आल्याचा चहा नक्की प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.