Shreya Maskar
उपवासाला अवघ्या १०-१५ मिनिटांत रताळ्याचे गोड काप बनवा.
रताळ्याचे गोड काप बनवण्यासाठी रताळी, तूप, पिठीसाखर, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
रताळ्याचे गोड काप बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा.
त्यानंतर रताळी कोरडी करून गोलाकार काप करून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रताळ्याचे काप टाकून शिजवून घ्या.
रताळी अर्धवट शिजल्यानंतर त्यात पिठीसाखर घालून मिक्स करा.
यात वेलची पावडर आणि आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून शिजवून घ्या.
अशाप्रकारे रताळ्याचे गोड काप तयार झाले आहेत.