Shreya Maskar
केळफुलाची भाजी बनवण्यासाठी केळफुल, काळे चणे, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, काळा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ , आमसूल, मीठ आणि खोबरं हे साहित्य लागते.
केळफुलाची भाजी बनवण्यासाठी काळे चणे पाण्यात भिजवून ठेवा.
केळफुलं सोलून कळ्यांचे गुच्छ वेगळे करून घ्यावेत.
सर्व कळ्या सोलून झाल्या की त्या बारीक चिरून घ्या.
केळफुलं मिठाच्या पाण्यात तीन चार तास भिजवून ठेवा. यामुळे केळफुलाचा चीक निघून जातो.
केळफुलं आणि चणे वेगवेगळ्या डब्यात प्रेशर कुकरमध्ये उकडवा.
पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करा.
शिजवलेले चणे आणि केळफुलं फोडणीमध्ये घाला आणि त्यात काळा मसाला, मीठ, चिंचेचा कोळ घालून एक वाफ काढावी.
शेवटी गूळ आणि खोबरं टाकून भाजी मिक्स करा.