Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात नाश्त्याला काहीतरी गरमा गरम आणि गोड खाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते.
पुढे आपण गरमागरम आणि गोड रताळ्याच्या शिऱ्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
रताळी ५ ते ६. गूळ बारीक किसलेला १ वाटी, तूप, सुकामेवा इ.
रताळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील माती आणि अशुद्धता निघून जाईल. स्वच्छ केलेली रताळी कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा.
रताळी थंड झाल्यानंतर त्यांची साल काढून ती बारीक कुस्करून घ्या. एका जाड बुडाच्या पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तूप गरम करा.
गरम तुपात गूळ टाकून तो पूर्णपणे विरघळेपर्यंत सतत ढवळत राहा. गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये कुस्करलेले रताळे घालून नीट एकजीव करा.
शिरा पॅनला चिकटू नये म्हणून मिश्रण सतत ढवळत राहणे महत्त्वाचे आहे.
शेवटी बदाम, काजू, मनुका किंवा आवडीचा सुकामेवा घालून मिश्रण चांगले मिक्स करा.
तयार झालेला वटपौर्णिमा स्पेशल रताळ्याचा शिरा गरमागरम सर्व्ह करा आणि उपवासाची गोडी वाढवा.