Sweet Potato Chaat: समोसा चाट विसरा! हिवाळ्यात खास बनवून खा चटपटीत रताळ्याची चाट, वाचा परफेक्ट स्ट्रीट-स्टाईल रेसिपी

Dhanshri Shintre

रताळी स्वच्छ धूऊन घ्या

रताळी स्वच्छ धुऊन प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि २-३ शिट्ट्या येईपर्यंत शिजू द्या, मग थंड करून वापरा.

साल काढा आणि कापा

रताळी उकडून थंड झाल्यावर त्याची साल काढा आणि मग त्याचे गोल किंवा चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा.

रताळे भाजून घ्या

कढईत थोडं तेल गरम करा आणि रताळ्याचे तुकडे घालून ते हलके सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

मसाले एकत्र करा

मोठ्या भांड्यात तुकडे घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मीठ मिसळून व्यवस्थित एकत्र करा.

लिंबाचा रस घाला

तयार मिश्रणावर चाट मसाला व लिंबाचा रस टाका, नंतर हलक्या हाताने सर्व घटक नीट मिसळून एकसंध करा.

सर्व्ह करा

शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेव पसरवा, सुंदर सजावट करा आणि त्वरित प्लेटमध्ये वाढून सर्व्ह करा.

NEXT: बिर्याणी विसराल! काही मिनिटांत तयार करा परफेक्ट झणझणीत व्हेज फ्राईड राईस, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

येथे क्लिक करा