Shreya Maskar
रताळ्याचे चाट बनवण्यासाठी उकडलेले रताळे, चाट मसाला, मीठ, लिंबाचा रस, हिरवी मिरची, डाळिंबाचे दाणे, दही, जिरे पावडर इत्यादी साहित्य लागते.
रताळ्याचे चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवा.
आता एक मोठ्या बाऊलमध्ये रताळ्याचे काप करून टाका.
त्यानंतर या मिश्रणात चाट मसाला, काळे मीठ, आणि जिरे पावडर टाकून मिक्स करून घ्या.
चाटची चव वाढविण्यासाठी लिंबाचा रस त्यात पिळा.
आता या मिश्रणात सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून त्यात दही आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका.
शेवटी रताळ्याचे चाट डाळिंब आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
चटपटीत संध्याकाळचा नाश्ता रताळ्याचे चाट तयार झाला.