Shruti Vilas Kadam
स्वीट कॉर्न, बारीक चिरलेले गाजर, फ्रेंच बीन्स, स्प्रिंग ओनियन, लसूण, आले, कॉर्नफ्लोअर, काळी मिरी, मीठ आणि पाणी अशी साधी सामग्री लागते.
स्वीट कॉर्न शिजवून घ्या. त्यातील काही कॉर्न मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. उरलेले कॉर्न सूपमध्ये वापरता येतील.
पॅनमध्ये थोडे तेल किंवा बटर गरम करून त्यात चिरलेले आले, लसूण आणि स्प्रिंग ओनियन घाला. त्यानंतर गाजर आणि फ्रेंच बीन्स घालून काही मिनिटे परता.
परतलेल्या भाज्यांमध्ये शिजवलेला कॉर्न आणि वाटलेले कॉर्न घाला. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून हे मिश्रण उकळू द्या.
एका वाटीत कॉर्नफ्लोअर आणि थोडे पाणी घेऊन गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने स्लरी तयार करा. ती हळूहळू सूपमध्ये मिसळा.
सूपमध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला. सूप थोडे घट्ट होईपर्यंत काही मिनिटे शिजवा. गरजेनुसार पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
सूप तयार झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली स्प्रिंग ओनियन घालून सजवा. गरमागरम स्वीट कॉर्न सूप स्टार्टर किंवा संध्याकाळच्या हलक्या स्नॅकसाठी सर्व्ह करा.