Shreya Maskar
स्वीट कॉर्न कबाब बनवण्यासाठी पालक, मटार, हिरवी मिरची, स्वीट कॉर्न, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, पनीर, बटाटा, लाल तिखट, ब्रेड क्रम्स, जिरे, धणे पावडर, तेल आणि आमचूर पावडर इत्यादी साहित्य लागते.
स्वीट कॉर्न बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटा, मटार आणि स्वीट कॉर्न कुकरमधून शिजवून घ्या.
बाऊलमध्ये बटाटा, मटार आणि स्वीट कॉर्न एकत्र मॅश करा.
मॅश करून झाल्यानंतर यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून एकजीव करा.
त्यानंतर मिश्रणात चवीनुसार मीठ, पनीर, जिरे-धणे पावडर, आमचूर पावडर घालून व्यवस्थित एकत्र करा.
शेवटी यात ब्रेड क्रम्स घालून मिक्स करा.
छोटे कबाब बनवून त्यावर काजूचा बारीक तुकडा लावा.
तेलात स्वीट कॉर्न कबाब खरपूस भाजून घ्या.