ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरच्या घरी झटपट तयार होणारी, चवीला आंबट-गोड आणि आरोग्यदायी अशी डाळिंबाची चटणी पोळी, भाजी किंवा स्नॅक्ससोबत ही चटणी खूपच छान लागते.
डाळिंबात अॅंटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमााणात असतात. डाळिंबामुळे पचन सुधारते, रक्त वाढवते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते. डाळिंबाची चटणी करुन खाल्यासही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची, आले, जिरे, मीठ चवीनुसार, गूळ आणि कोथिंबीर ई. साहित्य लागते.
थोडे कढईत जिरे घ्या आणि हलके भाजून घ्या. जिरे भाजून घेतल्यामुळे चटणीला छान सुगंध आणि चव येते.
मिक्सरमध्ये डाळिंबाचे दाणे, भाजलेले जिरे, मीठ आणि गूळ घाला. सर्व साहित्य एकत्र केल्याने चटणीची चव नीट राहते.
सर्व साहित्य जाडसर वाटून घ्या. चटणी जास्त पातळ करू नका. गरज असल्यास अगदी थोडं पाणी घालू शकता, पण चटणी घट्टच चांगली लागते.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एक हलकेसे वाटून घ्या. चटणीला कोथिंबीर ताजेपणा आणि सुगंध देते.
ही आंबट-गोड चटणी पोळी, भाजी, पराठा, समोसा किंवा स्नॅक्ससोबत सर्व्ह करावी.
गूळा नको असल्यास तुम्ही खजूर किंवा मध वापरू शकता.तसेच चटणी जास्त आंबट हवी असल्यास थोडं लिंबू घाला. ही चटणी फ्रिजमध्ये २ दिवस टिकून राहते.