Manasvi Choudhary
जेव्हा तुम्ही रात्री गाढ झोपेत असतात तेव्हा तुम्हाला अनेक स्वप्न येतात.
मात्र ही स्वप्ने काही चांगली आणि काही वाईट असू शकतात.
व्यक्तीला पडत असलेल्या स्वप्नाचा परिणाम वेगवेगळा असू शकतो.
माहीतीनुसार, स्वप्नात काही गोष्टी पाहणे शुभ आणि अशुभ देखील मानले जाते.
स्वप्नात काही पक्षी दिसणे विशेषत: शुभ असते.
स्वप्न शास्त्रानुसार, रात्री झोपताना स्वप्नात पोपट दिसणे शुभ मानले जाते.
स्वप्नात पोपटांची जोडी दिसली तर याचा अर्थ घरात नवीन पाहुणे येणार आहेत असे मानले जाते.
स्वप्नात पोपट दिसणे म्हणजे वैवाहिक जीवन प्रेमाने बहरेल.
जर तुम्हाला स्वप्नात घुबड दिसले तर याचा अर्थ तुमच्यावर लक्ष्मीचा आशिर्वाद आहे असा होतो.
जो व्यक्ती स्वप्नात घुबड पाहतो त्याला लवकरच कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे मिळतात.
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात मोर दिसणे शुभ मानले जाते.
स्वप्नात मोर दिसणे म्हणजे जीवनात सुख - समृद्धी येणार तसे मोठे यश प्राप्त होणार असल्याचे मानले जाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.