Chetan Bodke
२०२३ या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटींनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे.
चला तर एक नजर टाकूया, कोणकोणत्या मराठी सेलिब्रिटींनी प्रेमाची कबुली दिली आहे.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत प्रेमाची कबुली दिली.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही बॉयफ्रेंड नीलेश जगदाळेसोबत व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त केले.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने जुलै महिन्यामध्ये प्रेमाची कबुली दिली. नुकतंच ही जोडी लग्नबंधनात अडकली.
अभिनेत्री पूजा सावंत आणि बॉयफ्रेंड सिद्धेश सोबतच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
‘येऊ कशी कशी मी नांदायला’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकरने काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरसोबत साखरपुडा आटोपला.
‘पिंकाचा विजय असो’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणे हिने बॉयफ्रेंड जयंत लाडेसोबत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुपचूप साखरपुडा उरकला.