Siddhi Hande
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या मंगळसूत्राचा ट्रेंड सध्या खूप व्हायरल होत आहे. याचसोबत स्वानंदीच्या साड्यांचीही क्रेझ आहे.
स्वानंदी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसताना दिसते. तिने साखरपुड्यासाठी नेसलेल्या पैठणी साडीचा हिरवा रंग खूप सुंदर आहे.
आकाशी रंगाची साडी आणि त्यावर असलेली मिनिमल डिझाइन खूप सुंदर आहे. त्यावर गळ्यात चिंचपेटी घालू शकता.
पिवळ्या रंगाची काठपदर साडी प्रत्येक मुलीवर उठून दिसते. त्यावर मोत्याचे दागिने खूपच सुंदर दिसतात.
पिवळ्या रंगाची साडी परंतु काठावर थोडी गडद रंगाची शेड हे कॉम्बिनेशन खूपच मस्त आहे. त्यावर मोराची सुंदर डिझाइन असेल तर तुमचा लूक सर्वात भारी दिसेल.
पिस्ता कलरची साडी आणि त्यावर कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज घातल्यावर सर्वांमध्ये तुमच्या स्टाईलचे कौतुक होईल. त्यावर साडीप्रमाणेच एकदम मिनिमल मेकअप लूक करा.
सध्या कॉटनच्या साडीचा ट्रेंड आहे. स्वानंदीने घातलेल्या या मेहंदी रंगाच्या साडीवर प्राजक्ताची पांढऱ्या रंगाची फुले आहेत.यामुळे वेगळाच लूक आला आहे.
पिंक कलरचा ऑरगॅन्झा किंवा सिल्क साडी खूप सुंदर वाटते. काठावर बारीक डायमंड डिझाइनमुळे लूक अजूनच खुलतो.
गोल्डन रंगाची प्लेन काठपदर साडी तुम्ही नेसू शकतात. त्यावर मरुन किंवा जांभळ्या रंगाचा कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज आणि एक सिंपल पेडंट घातलं की तुमचा लूक तयार आहे. हा सोबर लूक खूप मस्त वाटेल.