Manasvi Choudhary
हिंदू धर्मात फुले आणि गजरा अत्यंत पवित्र मानला जातो. पूजेसाठी आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी फुलांचा गजरा लावणे शुभ मानले जाते.
फार पूर्वीपासून स्त्रिया देखील केसांना गजरा लावतात. गजरा केवळ सौंदर्यासाठीच नाहीतर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
महिला पारंपारिक कार्यक्रम, पूजा आणि लग्न समारंभामध्ये केसांना गजरा लावतात.
केसांना गजरा लावण्याच्या विविध हेअरस्टाईल आहेत. तुम्ही देखील सहजरित्या या हेअरस्टाईल करू शकता.
केसांचा बन बांधून त्याभेवती गजरा लावल्यानंतर देखील तुमचा लूक उठून दिसेल.
केसांची वेणी घालून वेणीच्या प्रत्येक गाठीच्या मधोमध गजरा लावायचा आहे. गजरा पूर्ण वेणीला लावल्यास लूक आकर्षक दिसेल.
केसांचा आंबाडा बन करून त्याला गजरा पूर्णपणे झाकून घ्या ही हेअरस्टाईल देखील तुम्ही करू शकता पारंपारिक साडी लूकवर अशी हेअरस्टाईल उठून दिसते
केसांचा अंबाडा बाधून गजरा फक्त अंबाडाच्या एका बाजूला अर्धचंद्र लावू शकता हा देखील तुम्ही पार्टीसाठी करू शकता.