Siddhi Hande
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
तुम्ही स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधानच्या हेअरस्टाईल ट्राय करु शकतात. साडीपासून ते प्रोफेशनल आउटफिटवर या हेअरस्टाईल सूट होतील.
तुम्ही सिंपल कॉटन साडीवर वेणी घालू शकता. वेणी जास्त घट्ट घालू नका. यानंतर पुढे लहान केसांची बट घ्या.
तुम्ही साडीवर सिंपल सोबर आंबाडा घालू शकतात. त्यावर गजरा माळल्यावर तो खूपच सुंदर दिसेल.
तुम्ही केस मोकळे सोडून त्याची पुढच्या बाजूने बारीक वेणी घालू शकतात. यामुळे केसदेखील सेट राहतील.
तुम्ही केस मोकळे सोडून त्याला खालून थोडे कर्ल्स करु शकता. यामुळे मोकळ्या केसांना अजून सुंदर लूक येईल.
तुम्ही शॉर्ट हेअरदेखील करु शकतात. हे केस ब्लो ड्रायरने छान सेट करा.
घागऱ्यावर तुम्ही वेगवेगळी आंबाडा हेइरस्टाईल ट्राय करु शकतात. ही हेअरस्टाईल खाली मानेच्या बाजूला करा.
तुम्ही सिंपल प्लेन साडीवर केसांची पोनी बांधू शकतात. यावर पुढून काहीतरी छान हेअरस्टाईल करा.
तुम्ही कॅज्युअल ब्लेझर लूकवर स्ट्रेटनिंग करु शकतात.
तुम्ही ब्लेझर घातल्यावर त्यावर बारीक डिझाइनची खजूर वेणी घालू शकतात.