Shreya Maskar
रत्नागिरी 'हापूस' आंब्यांसाठी, नयनरम्य सागरी सौंदर्यासाठी आणि समृद्ध इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक जलदुर्ग आहेत.
सुवर्णदुर्ग हा १६ व्या शतकातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे बंदराजवळील एक प्रमुख सागरी किल्ला (जलदुर्ग) आहे. सुवर्णदुर्गला सुवर्ण किल्ला असेही म्हणतात.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पोहोचण्याचा सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे हरनाई बंदरावरून होणारा १५ मिनिटांचा नौका प्रवास. बोटीतून तुम्हाला निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.
सुवर्णदुर्ग हा ऐतिहासिक जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० ते १६६५ च्या दरम्यान बांधून बळकट केला. हा किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र होते.
सुवर्णदुर्गला २४ सुबक आणि मजबूत बुरुजे आहेत. येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
कान्होजी आंग्रे यांनी या सुवर्णदुर्गासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. सुवर्णदुर्ग सरखेल कान्होजी आंग्रे यांचा तो जन्म आणि कार्यस्थान होते. मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून त्यांनी या किल्ल्यावरून इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दीला आव्हान दिले.
सुवर्ण दुर्ग जवळ हर्णे बंदर, कनकादुर्ग, मुरुड व कर्दे बीच, फत्तेगड, कर्दे बीच आणि केशवराज मंदिर अशी अनेक ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.