Shreya Maskar
सुतार फेणी ही प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये बनवली जाणारी एक पारंपारिक गोड मिठाई आहे. आजकाल लग्न समारंभात याचा आस्वाद घेता येतो.
सुतार फेणी बनवण्यासाठी पिठीसाखर, सुका मेवा , साजूक तूप, डायफ्रूट्स आणि दूध इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
सुतार फेणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या परातीत मैदा आणि थोडे तूप/पाणी मिसळून पीठ मळून घ्या. त्यातून पातळ पदर तयार करा.
हे पदर तव्यावर हलके भाजून घ्या किंवा साजूक तुपात गोल्डन फ्राय करा. गॅस मंद आचेवर ठेवून द्या.
आता एका पॅनमध्ये साखर आणि पाणी टाकून पाक तयार करा. या पाकात तळलेल्या सुतार फेणी घाला. संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा, जेणेकरून चुकणार नाही.
डायफ्रूट्सचे बारीक काप करून घ्या. त्यानंतर सुतार फेणीवर डायफ्रूट्स भरभरून टाका.
सुतार फेणी ही मिठाई गरमागरम दुधात टाका आणि वरून त्यात थोडी साखर घ्या. अशाप्रकारे सुतार फेणीचा आस्वाद घ्या. तुम्ही दुधात न बुडवता सुखी सुद्धा सुतार फेणी खाऊ शकता.
सुतार फेणी बनवताना ती जास्त कुरकुरीत करण्यासाठी तुपाचे योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे. जेणेकरून प्रत्येक घासात चव वाढेल.