Shreya Maskar
स्ट्रीट स्टाइल मिरची वडा घरीच सिंपल पद्धतीने बनवता येतो. झटपट होणारी रेसिपी आताच लिहून घ्या. एक घास खाताच लहान मुलं खुश होतील.
मिरची वडा बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर, बेसनाचे पीठ , तांदळाचे पीठ, हळद, ओवा, बेकिंग सोडा, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मिरची वडा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाका. फोडणी तडतडली की त्यात हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट घालून परता.
आता हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. त्यानंतर उकडलेले बटाटे कुस्करून मिक्स करा. जेणेकरून सारण खूपच चवदार बनेल.
शेवटी पॅनमध्ये लिंबाचा रस कोथिंबीर, उरलेले सर्व मसाले टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. गॅस बंद करा आणि सारण थंड होऊ द्या.
हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून एका बाजूने चिर पाडून त्यातील बिया काढून टाका. मिरचीत तयार केलेले बटाट्याचे सारण भरपूर भरा
एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, ओवा आणि बेकिंग सोडा मिक्स करा. यात थोडं पाणी घालून जाडसर पेस्ट बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून भरलेली मिरची बेसनाच्या पीठात घोळवून गरम तेलात सोडा. गॅस मध्यम आचेवर ठेवून मिरची वडा तळा.