Shruti Vilas Kadam
नवीन सुरुवात करत असाल तर दररोज ५ ते ६ सूर्यनमस्कार करण्यापासून सुरुवात करा. शरीराला सवय झाल्यानंतर संख्या हळूहळू वाढवा.
दररोज १२ सूर्यनमस्कार केल्यास शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. यामुळे कॅलरी बर्न होऊन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
फिटनेस तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी २० ते २५ सूर्यनमस्कार नियमित करणे फायदेशीर ठरू शकते.
१० ते १२ सूर्यनमस्कारांमुळे साधारण ८० ते १४० कॅलरीपर्यंत बर्न होऊ शकतात. गती आणि शरीराच्या वजनानुसार हा आकडा बदलतो.
सूर्यनमस्कारामुळे शरीराचा मेटाबॉलिझम वेगवान होतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते.
सूर्यनमस्कारामुळे हात, पाय, पोट, पाठ आणि खांद्यांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीर अधिक टोन आणि मजबूत बनते.
फक्त सूर्यनमस्कार करून वजन कमी होत नाही. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो.
Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी