Manasvi Choudhary
सुरण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर भाजी आहे. मात्र सुरणाची भाजी अनेकांना आवडत नाही.
सुरणाच्या भाजीऐवजी तुम्ही सुरणाचे काप ही रेसिपी ट्राय करू शकता. जेवणासोबत तोंडी लावायली ही रेसिपी करू शकता.
सुरणाचे काप बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सुरण धुवून घ्या. त्याचे पातळ काप करा.
यानंतर एका भांड्यात सुरणाचे काप घ्या.त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला टाका. त्यात मीठ टाकून मिक्स करा.
यानंतर एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ, रवा आणि लाल मसाला एकत्र करा.यानंतर सुरणाचे काप या रव्यात छान घोळवून घ्या.
एका बाजूला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर तेल टाका. यानंतर हे सुरणाचे काप त्यावर ठेवा. छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे काप भाजून घ्या.