Manasvi Choudhary
किडनी हा शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे आणि रक्ताचे फिल्टर करण्याचे कार्य किडनीमार्फत होते. यासाठी किडनीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी दररोज पाणी पिणे महत्वाचे आहे.
सर्वसाधारणपणे, निरोगी व्यक्ती दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे.
उन्हाळा आणि पावसाळा दरम्यान दमट वातावरणात शरीरातून घाम वाहत असतो अशावेळी अधिक पाण्याचे सेवन करा.
जर तुम्ही व्यायाम किंवा मेहनतीचे काम करत असाल तर तुम्हाला अधिक पाण्याची आवश्यकता असते.
पुरूषांना दिवसाला सुमारे ३.७ लीटर द्रवपदार्थांची गरज असते.
त्याचवेळी महिलांनी सुमारे २.७ ते ३ लीटर पाणी प्यावे.
फिकट पिवळ्या रंगाची लघवी याचा अर्थ असा आहे की तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात आणि तुमचे मूत्रपिंड निरोगी आहेत.
जर लघवी गडद पिवळी किंवा गडद रंगाची असेल, तर याचा अर्थ तुमच्या शरीराला अधिक पाण्याची गरज आहे.
जर एखाद्याला किडनीचा आजार असेल तर त्यांना कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो अशा रूग्णांसाठी जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.