Manasvi Choudhary
मराठी बिग बॉस सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण अलिकडेच लग्नबंधनात अडकला. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या दणक्यात सूरज चव्हाणने त्याचं लग्न केलं आहे.
सूरज चव्हाणने मामाची मुलगी म्हणजेच त्याची बालपणीची मैत्रिण हिच्याशी लग्न केले आहे. सूरजच्या बायकोचे नाव संजना आहे.
लग्नाआधी सूरज आणि संजना यांनी प्रीव्हेडिंग फोटोशूट केलं आहे. जे त्यांचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. रॉयल अंदाजात दोघांनीही फोटोशूट केलं आहे.
सूरजने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये सूरजने कारभारीण असं म्हटलं आहे. तर संजना देखील इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते.
संजनाने देखील इन्स्टाग्रामवर तिचं नवीन अकाउंट सुरू केलं आहे. सूरजसोबत लग्न केल्यानंतर तिने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.
या फोटोत संजनाचा लूक सुंदर दिसत आहे. तिने हिरवी साडी आणि हिरवी चोळी परिधान केली आहे. तिचा लूक उठून दिसत आहे.
संजनाने नऊवारी साडी असा लूक केला आहे. तर सूरज पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. दोघांचाही मराठमोळा लूक आहे.
हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीलूकवर संजनाने पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे. नाकात नथ, कपाळी टिकली, हातात बांगड्या तिने घातल्या आहेत.