Manasvi Choudhary
अनेकजण हॉटेल, ढाब्यावर गेल्यानंतर मटार पनीरचा आस्वाद घेतात. मटार पनीर चवीष्ट लागतो. तुम्ही घरी देखील अत्यंत सोप्या पद्धतीने मटार पनीर बनवू शकता.
ं
मटार पनीर बनवण्यासाठी पनीर, मटार, कांदा, टोमॅटो, आलं - लसूण पेस्ट, तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, मसाला, धना पावडर, गरम मसाला, कस्तुरी मेथी, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी मटार पनीर बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण याचा बारीक पेस्ट करा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग याची फोडणी द्या. यानंतर या मिश्रणात कांदा- टोमॅटोची पेस्ट परतून घ्या नंतर हे मिश्रण चांगले शिजवून घ्या.
मिश्रणात हळद, लाल मसाला, धना पावडर, गरम मसाला हे मसाले मिक्स करा. नंतर मिश्रणात मटार आणि थोडेसे पाणी घाला आणि मिश्रण शिजवण्यासाठी त्यावर झाकण ठेवा.
भाजी उकळ आली की त्यात पनीरचे तुकडे मीठ आणि कस्तुरी मेथी मिक्स करा. अशापद्धतीने चमचमीत पनीर मटार घरच्या घरी तयार होईल.