ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रोल असतात. एक चांगले कोलेस्ट्रोल आणि एक खराब कोलेस्ट्रोल.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या कोलेस्ट्रोलची गरज असते.
रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास चांगले कोलेस्ट्रोल वाढते. आणि हृदय निरोगी राहते. हे पदार्थ कोणते जाणून घ्या.
ऑलिव्ह ऑयलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे शरीरातील चांगले कोलेस्ट्रोल वाढवण्यास मदत करतात.
बदाम, अक्रोड आणि काजू यामध्ये हेल्दी फॅट्स , फायबर आणि ओमेगा- ३ऑसिड्स असतात. जे चांगले कोलेस्ट्रोल वाढवण्यास मदत करतात.
दररोज मूठभर ड्राय फ्रुट्स खा. यामुळे एकूण आरोग्य सुधारते.
आहारात सॅलमन म्हणजेच रावस, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या माशांचा समावेश करा.