ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साकाळी लहान मुलांच्या नाश्ट्यासाठी नेमकं काय बनवायचं असा प्रश्न अनेकदा पडतो. मुलांच्या आहारात पोषक आहारांचा समावेश करणे आवश्यक असते.
पोषक आहाराच्या सेवनामुळे लहान मुलांच्या आरोग्याची वाढ होते त्याचबरोबर आरोग्या संबंधीत समस्या निर्माण होत नाहीत.
सकाळी नाश्ट्या आधी तुमच्या मुलांच्या आहारात या पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
भिजवलेले बदाम साकाळी रिकाम्या पोटी खाल्यास स्मरणशक्ती मजबूत होते आणि हाडांची वाढ निरोगी होण्यास मदत होते.
सफरचंद खाल्ल्यामुळे लहान मुलांचे पोट साफ राहाते आणि गॅस सारख्या समस्या होत नाहीत.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी केळी खाल्यामुळे दृष्टी चांगली राहाते त्याबरोबर हाडं मजबूत होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.