Manasvi Choudhary
रविवारचा दिवस असला की घरात काहीतरी खास किंवा चमचमीत पदार्थ. तुम्ही नॉनव्हेज खिमा रेसिपी खाल्लीच असेल पण तुम्ही कधी व्हेज खिमा रेसिपी ऐकलीये का?
आज आम्ही तुम्हाला टेस्टी मशरूम खिमा रेसिपी सांगणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करू शकता.
मशरूम खिमा रेसिपी बनवण्यासाठी मशरूम, कांदा, मसाला, हळद, गरम मसाला, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर, तेल हे साहित्य घ्या.
रेसिपी बनवण्यासाठी सर्वातआधी मशरूम स्वच्छ धुवून बारीक कापा.
भाजी बनवण्यासाठी बारीक कांदा कापा.
त्यानंतर गॅसवर कढईत गरम तेलामध्ये कांदा छान परतून घ्या.नंतर त्यात आललसूण पेस्ट, तिखट,हळद,मीठ घाला नी परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेले मशरूम घाला
मिश्रणात मशरूम चांगले परतून घ्या. संपूर्ण मसाले मशरूममध्ये मिक्स होतील.
अशाप्रकारे घरच्या घरी मशरूम खिमा तयार होईल.