Manasvi Choudhary
आज रविवार स्पेशल नॉन व्हेज पदार्थामध्ये तुम्ही चिकन बिर्याणी बनवू शकता. चिकन बिर्याणी घरी बनवण्याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चिकन बिर्याणी बनवण्यासाठी चिकन, बासमती तांदूळ, दही, आले- लसूण पेस्ट, मसाला, हळद, बिर्याणी मसाला, मीठ, कांदा, टोमॅटो, पुदीना, कोथिंबीर, हिरवी मिरची, तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी हे साहित्य एकत्र करा.
चिकन बिर्याणी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात चिकन स्वच्छ धुवून त्यात दही, आले- लसूण पेस्ट, मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये कांदा कुरकुरीत, गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
याच कढईत खडे मसाला, हिरवी मिरची, टोमॅटो टाकून परतून घ्या नंतर या मिश्रणात मॅरिनेट केलेले चिकन मिक्स करा.
चिकन वाफेवर शिजवून घ्यायचे आहे. या नंतर शिजलेल्या चिकनमध्ये पुदीना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा पसरवून घ्या.
या संपूर्ण मिश्रणात तुम्हाला तांदूळ मिक्स करायचा आहे. तांदळामध्ये तुम्हाला कोमट पाणी घालायचे आहे. अशाप्रकारे नंतर तुम्हाला बिर्याणीवर झाकण ठेवून शिजवायची आहे.
तांदूळ शिजताना त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकला तर भात मोकळा आणि पांढराशुभ्र होतो.