Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सूर्यदेवांना ग्रहांचा राजा मानला जातो. रविवार हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी कोणतेही कार्य केले तर त्याचा परिणाम कुंडलीतील सूर्याच्या स्थितीवर परिणाम होतो.
ज्योतिषशास्त्रात, केवळ पूजा- अर्चनाच याविषयी सांगितलं नाही तर वस्तू खरेदी करण्याविषयी देखील सांगितलं आहे.
रविवारी काही विशिष्ट वस्तू खरेदी केल्यास सूर्यदेव नाराज होऊ शकतात. त्यामुळे रविवारी कोणत्या ५ वस्तू खरेदी करणे टाळावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार, लोखंड हे शनिदेवांची धातू मानली जाते. रविवारी लोखंड किंवा हार्डवेअरच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.
रविवारी मीठ खरेदी करणे अशुभ मानले जाते. या दिवशी घरात मीठ आणल्यास आर्थिक नुकसान होते.
रविवारी सुट्टीच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते टाळावे.
रविवारी फर्निचर किंवा लाकडाच्या कोणत्याही वस्तू खरेदी करू नये.