Sakshi Sunil Jadhav
तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. तब्येतीच्या बाबतीत दिवस हिरवा कंदील घेऊन आलेला आहे.
मन आनंदी आणि आशावादी राहणार आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रवासातून फायदा होईल.
नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. ठरवेल ते करेलच अशी जिद्द आणि चिकाटी घेऊन आज पुढे जाणार आहात.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता संभवते आहे. जुने येणे सुद्धा वसूल होईल. दिवस समाधानकारक राहील.
आज मनाला उभारी येईल. ठरवलेल्या गोष्टीत नवीन दिशा नवा मार्ग सापडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. दिवस आनंदी आहे.
हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे. आपल्या वस्तू आणि महत्त्वाचे ऐवज आज सांभाळणे गरजेचे आहे. मनोबल कमी राहील.
प्रियजनांच्या सहवासामुळे दिवस चांगला वाटेल. अनेक लाभ होतील.
सामाजिक क्षेत्रामध्ये सहभाग घ्याल. आवडीच्या गोष्टी करण्याकडे कल राहील. उमेद वाढती राहील.
गुरुकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मोठे प्रवास घडतील. प्रवासामधून फायदा होईल.दानधर्माकडे विशेष कल वाढता राहील.
महत्त्वाची कामे रखडण्याची दाट शक्यता आहे. केलेल्या कष्टाला तितकेच फळ मिळेल असा दिवस नाही.
मी, माझे मतं काय त्याविषयी आज तुम्ही ठाम राहणे गरजेचे आहे. इतर कोणाच्याही सल्ल्याने पुढे जाऊ नका. आर्थिक निर्णय सुद्धा मार्गी लागणार आहेत.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा मात्र त्रास संभवतो आहे. नोकरीच्या ठिकाणी परीक्षाच आहे. पण अडचणींवर मात करून यश मिळवाल.
NEXT : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी