Sakshi Sunil Jadhav
नाशिक हे फक्त वाइनसाठीच नाही तर अस्सल महाराष्ट्रीयन स्वाद, स्ट्रीट फूड आणि पारंपरिक पदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. इथली काही खास डिशेस पाहिल्यावर खरंच तोंडाला पाणी सुटतं.
नाशिक स्टाईल मिसळ ही इतर कुठल्याही मिसळीपेक्षा वेगळी णझणीत तर्री, कुरकुरीत चिवडा आणि लोणचं सोबत कमाल लागते.
ग्रामीण चव शोधणाऱ्यांसाठी भाजलेला ठेचा, वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकरी आणि ताक हे पदार्थ लयभारी ठरतील.
कांद्याची किंवा प्याजाची भजी पावसाळा असो वा नसो नाशिककरांसाठी हे “ईवनिंग स्नॅक्स”चं अनोखं आकर्षण आहे.
नाशिकमधल्या कॉलेज तरुणांमध्ये अत्यंत फेमस चूप केबिनचा चीज डोसा आहे.
गंगाघाट परिसरातील गरमागरम वडा-पाव त्यावरचं स्पेशल कोरडं लसूण चटणी फोड देईल.
पाटोळ्या, पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि तूप नाशिकच्या घराघरातला गोडवारसाच आहे.
शेव, भेळ, समोसा, खमण, डाळवडा सगळं एका प्लेटमध्ये आणि प्रत्येक घासाला वेगळी मजा आहे.