Sakshi Sunil Jadhav
मोठ्या गुंतवणुका करायला हरकत नाही. अचानक लॉटरी लाभ संभवतो आहे. गणेश उपासना करावी.
सर्व ऐहिक गोष्टींवर आपले विशेष प्रेम आहे. मग घर असो, गाडी असो, जीवनात मिळणारा पैसा व प्रॉपर्टी असो.
आयुष्य नव्याने जगण्याची कला आपल्याला नेहमीच साधते. आज जवळचे काही प्रवास होतील. नव्याने ओळखी होतील.
न ठरवता काही गोष्टी सहज होणार आहेत. इतके दिवस आपल्या कुटुंबीयांसाठी केलेली मेहनत आज फळाला जाईल. रुची वाढेल.
स्वतःवरच आत्मविश्वास ढळू न देणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नव्याने काही गोष्टी झपाटून पेटून उठून कामाला लागाल.
नको असणाऱ्या काही गोष्टींचा ससेमिरा आज मागे लागेल. ठरवले ते होईलच असा आजचा दिवस नाही. खर्च होईल. मानसिकता सांभाळा.
मैत्रीचे बंध नव्याने दृढ होतील. प्रेमामध्ये अश्वस्त असणे आज गरजेचे आहे. दिवस चांगला आहे.
सिंहाप्रमाणे लढवय्या वृत्ती घेऊन आज आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही वावरणार आहात. बढतीचे योग आहेत. सहकार्याना बरोबर घेऊन चालाल.
आज अमावस्या चा विशेष योग उपासनेला आपल्या राशीला चांगला आहे. दानधर्म, दानत वाढेल. तीर्थक्षेत्री भेटी होतील.
काही गंडांतर अचानक येण्याची शक्यता आहे. मानसिकता सांभाळावी. तब्येत काळजी घ्यावी. मृत्यू भय दाटेल.
अनेक वेळा गाळात जाऊन नव्याने उभारणे आता आपल्याला सहज शक्य होत आहे. दिवस चांगला आहे.
अमावस्या थोडी घातक आज ठरेल असे वाटते आहे. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. हित शत्रूंचा त्रास संभवतो आहे.