Sunday Horoscope: आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा, रविवारचे राशिभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

चर तत्वाची अग्नी रास आपली आहे. आज तब्येतीच्या तक्रारी थोड्या जपाव्या लागतील. उष्णता वाढेल. कामात मात्र जोर असेल. नवीन नाते, परिचयांनी समृद्ध व्हाल.

मेष राशी | saam

वृषभ

राजकारण आणि समाजकारण विषयी आज विशेष ओढ तुम्हाला वाटेल. पैशाला महत्व ठेवून कामे कराल आणि ती पूर्ततेकडे जातील. दिवस चांगला आहे.

वृषभ | Saam Tv

मिथुन

नातवंड सौख्यच्या दृष्टीने दिवस सुंदर आहे. मनामध्ये अनेक दिवस राहिलेल्या गोष्टी आज सहज होताना दिसतील. लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस सुखकर आहे.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

एखाद्या वलयामध्ये अडकल्याची भावना होईल. त्याच त्याच गोष्टी वारंवार मागे लागतील. अडचणीतून मात्र एकट्यालाच वाट काढावी लागेल.

कर्क राशी | saam

सिंह

व्यवसायाला नव्याने वाटा फुटतील. भागीदाराला विशेष महत्त्व देऊन आपल्या पद्धतीने त्यांच्याकडून कामे करून घ्यावे लागतील. नव्याने कामाला उत्साह येईल.

सिंह राशी | saam

कन्या

मामाकडून विशेष फायद्याचा दिवस आहे. गुप्त शत्रू त्रास देतील. अडचणीचा सामना करून दिवस काढावा लागेल. तर नव्याने वाट मिळेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज धनयोगासाठी दिवस चांगला आहे. शेअर्समधील गुंतवणूक, लॉटरी, रेस यामधून फायदा होईल. लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

अथक परिश्रम करणारी आपली रास आहे. आपल्यासाठी कोण काय करतो यापेक्षा आपण इतरांसाठी किती करू शकतो हा आपण विचार करा. कुटुंबीयांसाठी सुखाचे चार क्षण येतील अशा काही गोष्टी आज तुम्ही कराल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

पराक्रमाची शर्थ होईल. मात्र निर्णय घेताना कचराई नको. जवळच्या प्रवासातून फायदा आहे आज आपल्या वाणीला, वक्तृत्वाला विशेष धार येईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

सोबतीचा करार असा काहीसा दिवस आहे. आपल्या लोकांकडून मनासारख्या गोष्टी आणि भक्कम आधार आज तुम्हाला मिळणार आहे.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

काही गोष्टी मनामध्ये ठरवून आज कार्यरत रहाल. सकारात्मकता वाढीला लागेल. शनीची आवडती असणारी आपली रास सुखद गोष्टी घडतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

जे ठरवले आहे ते करण्यामध्ये आज व्यस्तता असेल. आपल्या साध्या आणि चांगल्या स्वभावाचा फायदा जवळचे लोक घेतात हे पाहून वाईट वाटेल. मनोबल सांभाळावे.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: कमी तेलात संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा झटपट कुरकुरीत खाकरा चाट

Khakhra Chaat Recipe | google
येथे क्लिक करा