Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Sakshi Sunil Jadhav

मेष

कोणाचीतरी प्रेरणा घेऊन आज पुढे जाल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. दिवस धावपळीचा असला तरी दिवसाच्या शेवटी स्वस्थता लाभेल.

मेष राशी | saam

वृषभ

"प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी" मुग्ध आणि अबोल प्रेमात आज धुंद राहाल. दिवस रसरशीत आणि मनस्वी जगण्यासाठी प्रयत्न कराल.

वृषभ | Saam Tv

मिथुन

विविध गुणांनी नटलेली आपली रास आहे. लोकांच्या मिसळायलाही आपल्याला आवडते. आज घरी पाहुण्यांची ऊठबस होईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

बहिणीचे प्रेमाने माया आज लाभणार आहे. सहजगतीने दिवस मोठे यश पदरात पडणार आहे. अडकलेले पत्रव्यवहार मार्गी लागतील.

कर्क राशी | saam

सिंह

धन - दौलत, मुदत ठेवी, पैसा अडका यासाठीचे गुंतवणुकीला महत्त्वाचे निर्णय घ्याल. आजचा दिवस चांगला आहे. घरातील लोकांच्याकडून एक वेगळा आदर आपल्याला मिळेल.

सिंह राशी | saam

कन्या

बौद्धिक पातळी उत्तम असणारी आपली रास आहे. नवनवीन गोष्टी शिकायला नेहमीच आवडते. आज एखाद्या गोष्टीत समरसून जगायला आवडेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

उगाचच नको ते सोपस्कार आज करावे लागतील. कारण नसताना बंधन योग येतील. विनाकारण आपल्याविषयी अफवा सुध्दा उठतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

मैत्रीचे बंध घट्ट होतील. एकमेकांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यामधून आपली प्रगती आहे. जुन्या गुंतवणुकीतून विशेष लाभ होण्याचा आजचा दिवस आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

कर्मप्रधानत्व ठेवून पुढे जाल. कार्यक्षेत्रात नव्याने बाजी मारणार आहात. दिवसाचा आनंद यामुळे द्विगुणीत होईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

"लेट पण थेट" जाणारी आपली रास आहे. काही मोठ्या प्रवासाचे बेत आज पक्के होतील. शिव उपासना विशेष फायद्याची ठरेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

जोडीदाराकडून धनलाभाची शक्यता आहे. मात्र काही कामे एकट्यालाच आणि नेटाने करावी लागतील. परिश्रमांची शर्थ होईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

व्यवसायिक भागीदारी मध्ये आगेकुछ होईल. एकमेकांचे निर्णय व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर ठरतील.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

skincare tips for glow | google
येथे क्लिक करा