Sakshi Sunil Jadhav
दिवाळी म्हणजे उत्सव, प्रकाश आणि नटण्याचा काळ. या सणात प्रत्येक स्त्रीला आपला चेहरा तेजस्वी आणि तजेलदार दिसावा असं वाटतं. महागड्या पार्लर ट्रीटमेंट्सऐवजी काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो देऊ शकता.
एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी एकत्र करून फेसपॅक तयार करा. हे त्वचेवरील डेड स्कीन दूर करून चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देते.
अॅलोवेरा जेल त्वचेला थंडावा देते, ओलावा टिकवते आणि दिवसभर फ्रेश लुक देतो. रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी धुवा.
मध त्वचेतील ओलावा टिकवतो आणि लिंबू नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. दोन्ही एकत्र लावल्याने त्वचा उजळ आणि मऊ बनते.
दिवाळीच्या गडबडीत पाणी पिणं विसरू नका. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा आतून चमकदार राहते.
फळं, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खा. त्वचेला आवश्यक पोषण मिळालं तर ग्लो आपोआप येतो.
थंड दूध किंवा गुलाबपाण्याने सकाळी हलका मसाज करा. रक्तप्रवाह वाढतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसतं.
चेहऱ्यावर 5 मिनिटं वाफ घेतल्याने रोमछिद्र उघडतात आणि त्वचेवरील घाण व तेल निघून जातं. त्यानंतर फेसपॅक वापरा.
दररोज किमान 7-8 तासांची झोप घ्या. झोपेमुळे त्वचा रिफ्रेश होते आणि डार्क सर्कल्स कमी होतात.