Sakshi Sunil Jadhav
पैसे जसे येतात तसे त्याच्या जाण्याच्या गोष्टी ठरलेल्या असतात. आज जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
कलाकारांना चांगल्या संधी प्राप्त होतील. सकारात्मक आणि प्रभावी असे आज आपले व्यक्तिमत्व राहील. आरोग्य चांगले राहील.
व्यवसायामध्ये थोड्या अडचणी निर्माण होतील. मनस्ताप पाडणाऱ्या घटना घडतील. कटकटींवर मात करून पुढे जाल.
धनाशी निगडित व्यवहार घडतील. गुंतवणूक फायद्याची ठरेल. दुप्पट मोबदला मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे.
कार्यक्षेत्रामध्ये विशेष प्रगती कराल. बढतीचे प्रगतीचे योग आहेत.राजकारणात यश मिळेल.
सोपा आणि सहज आजचा दिवस आहे. सुलभतेने सर्व गोष्टी होतील. यश म्हणजे काय हे समजेल.
अचानक धनलाभ होतील. सरकारी कामांमध्ये मात्र आज व्यत्यय संभवतो आहे. एकटेपणाची भावना निर्माण होईल.
जोडीदाराबरोबर विनाकारण अबोला संबोधतो आहे. एकमेकांचा कौल घेऊन पुढे गेलात तर दिवसभरात मनस्वास्थ्य मिळेल.
उष्णतेचे विकार होतील. संकटांची मालिका सुरू होते की काय असा दिवस असेल. आजोळी प्रेम मिळेल.
विष्णू शिव उपासना आज चांगली ठरेल. आपल्या मधील वेगळेपण इतरांना जाणवेल. कलाकार थिएटर गाजवतील.
घरगुती गोष्टींमध्ये अडकून पडाल. मात्र काही जबाबदाऱ्या असतात ज्या आज पेलावे लागतील.
भावंड सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. शेजाऱ्यांच्या कडून सहकार्य मिळेल. दिवस संमिश्र आहे.