Sunday Horoscope: वृषभ राशीला लॉटरी तर ५ राशींचे अडथळे होणार दूर, वाचा रविवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

महत्त्वाची कामे दुपारनंतर केलेली बरे राहील. कारण नसताना आरोग्याच्या तक्रारी उदभवतील. आहारावर विशेष लक्ष केंद्रित करून मन स्वच्छ, चांगले ठेवा.

Mesh | saam tv

वृषभ

संततीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुम्ही घेतलेले निर्णय अंदाज योग्य दिशेने आहेत याची तुम्हाला खात्री होईल. शेअर्स आणि लॉटरीमध्ये भरपूर पैसा आज मिळेल.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

प्रॉपर्टीचे सौख्याला दिवस उत्तम आहे. जागेचे प्रश्न जर दिरंगाई मध्ये अडकले असतील तर आज ते मार्गी लागतील. वाहन सौख्यही चांगले आहे. दिवस उत्तम आहे.

Mithun | saam tv

कर्क

नोकरी व्यवसायामध्ये दैदिप्यमान प्रगती कराल. समाधानकारक सर्वच ठिकाणी स्थिती राहील.मनस्वास्थ्य उत्तम राहील. जवळच्या नातेवाईकांच्या सहकार्याने मैलाचा दगड पार कराल.

कर्क | Saam TV

सिंह

व्यवसायामध्ये अनिर्णित राहिले आहेत त्याचे निर्णय आज होतील. आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल. काही लना अचानक धनलाभाची सुद्धा शक्यता आहे. दिवस चांगला आहे.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

आपल्या राशीला सतत काही ना काळजी आणि चिंता आपल्या असतेच. आज मात्र आजचा दिवस याला अपवाद आहे.मन आनंदी आणि आशावादी राहील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

दैनंदिन कामे रखडतील. प्रवास हे शक्यतो टाळावे. प्रवासामध्ये काहीतरी कटकटी मागे लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या ऐवज आणि जिन्नस सांभाळा.

तूळ राशी | saam tv

वृश्चिक

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडणार आहेत. आरोग्य सुध्दा उत्तम राहील. विविध लाभ आज तुमच्या राशीला मिळतील. काळजीचे कारण नाही दिवस चांगला आहे.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

तुमचा कार्यक्षेत्रामध्ये एखादी गरुड झेप नक्की घ्याल. आपले मनोबल आणि आत्मविश्वासावर पुढे जावे. आपल्या सहकाऱ्यांची योग्य ती साथ हीच आजच्या दिवसाची जमेची बाजू ठरेल.

Dhanu Rashi | Yandex

मकर

ज्या दिवसांची अतिव वाट पाहत आहात, अशी एखादी महत्त्वाची घटना घडेल. भारतात काहींना तीर्थक्षेत्र स्थानी सुद्धा भेटीचे योग आहेत. शंकराची उपासना विशेषत्वाने करावी.

मकर | Saam Tv

कुंभ

कोणाचेही सहकार्याची अपेक्षा आज नकोच. "भीक नको कुत्र आवर" असा काहीसा दिवस आहे. वादविवाद टाळून पुढे जाणे आज गरजेचे आहे.

कुंभ | Saam Tv

मीन

भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल.इतरांवर तुमचा प्रभाव चांगला राहील. व्यवसायामध्ये नवीन गोष्टीत पाय रोवाल. दिवस चांगला आहे.

Meen | Saam Tv

NEXT: Chanakya Niti: हुशार लोक कोणालाच सांगत नाहीत या ५ गुणांबद्दल, वाचा सक्सेस मिळवण्याचे सिक्रेट

Chanakya Niti | google
येथे क्लिक करा