ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या उन्हाळ्याच्या झळा वातावरणात जाणवू लागल्या आहेत.
उन्हाळा सुरु झाला की मुलांना सुट्ट्या लागतात. मग प्रत्येक कुटुंब बाहेर गावी जायचे नियोजन करतात.
मात्र उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर फिरायला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याने उन्हाचा त्रास होणार नाही.
उन्हात फिरायला गेल्यानंतर शक्यतो हलके अन्न खावे.
अनेकवेळा उन्हात गेल्यानंतर संपूर्ण आहार खाण्याबदली हलके पदार्थ सेवन केले पाहिजे.
उन्हात फिरायला गेल्यानंतर तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
उन्हात फिरायला गेल्यानंतर वेळोवेळी पाणी प्यावे त्यामुळे उन्हाची समस्या जाणवत नाही.
बाहेर गेल्यानंतर जेवणाची वेळ चुकूवू नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.