Siddhi Hande
सध्या उन्हाळा सुरु आहे.उन्हाळ्यात जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जायचा विचार करत असाल तर मुंबईजवळील या ठिकाणाला भेट द्या.
मुंबईपासून अवघ्या तासभराच्या अंतरावर असलेल्या कर्जतला तुम्ही भेट देऊ शकतात.
कर्जत येथे अनेक ठिकाणी तुम्ही फिरु शकतात. तिथे तुम्हाला शांतता मिळेल.
कर्जतमधील कोथळीगड येथे तुम्ही भेट देऊ शकतात. या गडाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे अनेक गुफा आहेत.
हा ट्रेकर्ससाठी अतिशय उत्तम स्पॉट आहे. येथे तुम्हाला थंड हवा अनुभवता येईल.
तुमच्या वीकेंड किंवा वन डे ट्रीमसाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथील मोकळी हवा तुम्हाला खूप जास्त आवडेल.
कोंडेश्वर मंदिर हे जंगलात आहे. हे शिवमंदीर हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
कर्जत हे मुंबई अन् पुण्यापासून अवघ्या १ ते २ तासाच्या अंतरावर आहे. येथे आल्यावर तुम्हाला हिरवागार निसर्गाचा अनुभव मिळेल.
कर्जत हे फॅमिली पिकनिक, मित्रांसोबत फिरायला जायचे असेल किंवा ट्रेकिंगसाठी जायचे असेल तर परफेक्ट स्पॉट आहे.