Safety Tips : कारने डोंगराळ भागात फिरायला जाताय? या ७ गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा...

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्यातल्या सुट्टीतला प्रवास

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बऱ्याचदा सर्वजण लांब-लांब डोंगराळ भागात फिरायला जातात. तिथे घाटाचे रस्ते, बदलतं हवामान आणि लांबचा प्रवास यात भरपूर अडचणी येऊ शकतात.

summer travel safety tips

महत्वाच्या टिप्स

तुमचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी काही आवश्यक गोष्टी कारमध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढील माहिती एकदा वाचून घ्या.

family road trip tips

कपडेसोबत ठेवा

डोंगराळ भागात उन्हाच्या दिवसांमध्ये अचानक थंडी किंवा पावसाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हलकं जॅकेट, स्वेटर आणि रेनकोट कारमध्ये ठेवा.

summer vacation travel

आहाराकडे लक्ष द्या

प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी हॉटेल किंवा दुकान उपलब्ध असेलच असं नाही. पाण्याच्या बाटल्या, बिस्किटं, ड्रायफ्रूट्स किंवा इतर हलके खाण्याचे पदार्थ सोबत ठेवल्याने अडचण येत नाही.

safe road trip checklist

गाडीची कागदपत्रे

आरसी बुक, विमा, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पीयूसी प्रमाणपत्र यांची तपासणी करूनच प्रवासाला निघा. आवश्यक कागदपत्रांच्या डिजिटल प्रती मोबाईलमध्ये सेव करून ठेवणंही फायदेशीर ठरेल.

emergency travel kit

रोख रक्कम बाळगा

डोंगराळ किंवा दुर्गम भागात अनेकदा ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध नसते. अशावेळी थोडी रोख रक्कम जवळ असेल इंधन, अन्न किंवा इतर खर्च भागवणं सोपं होतं.

first aid kit for travel

मोबाईलचा चार्जर

प्रवासात नेहमी संपर्कासाठी मोबाईलसोबत ठेवाच. पूर्ण चार्ज असलेली पावर बँक आणि कार चार्जर सोबत ठेवा.

long drive essentials

टॉर्च किंवा इमर्जन्सी लाईट ठेवा

घाटाच्या रस्त्यावर किंवा दुर्गम भागात रात्री प्रकाशाची कमतरता असू शकते. अशावेळी टॉर्च किंवा रिचार्जेबल इमर्जन्सी लाईटसोबत ठेवणं फायद्याचं ठरू शकतं.

hill road precautions

फर्स्ट एड किट

प्रवासादरम्यान किरकोळ दुखापत, डोकेदुखी किंवा मळमळ यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे प्राथमिक उपचारांसाठी आवश्यक औषधं आणि साहित्य असलेले फर्स्ट एड किट कारमध्ये ठेवा.

hill road precautions

NEXT: 198 रुपयांमध्ये दिवसाला 2 GB डेटा अन् मिळणार या विशेष सुविधा

NEXT : Jio Plan : फक्त ७७ रुपयांत जिओचा नवा प्लॅन; मिळणार ३ जीबी डेटा अन् बरंच काही
येथे क्लिक करा