ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ताडगोळ्यामध्ये नैसर्गिक थंडावा देणारे घटक असतात. उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो.
ताडगोळ्याच्या सेवनामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. यामुळे घामाच्या माध्यमातून होणाऱ्या द्रवाच्या कमतरतेची भरपाई होते.
ताडगोळ्याचे नियमित सेवन केल्यास त्वचेतील उष्णतेमुळे होणाऱ्या समस्यांपासून संरक्षण मिळते आणि त्वचेला नैसर्गिक उजाळा मिळतो.
उष्णतेमुळे लघवीतील जळजळ, कमी होणं यांसारख्या त्रासांवर ताडगोळा खूप फायदेशीर ठरतो.
गर्भवती महिलांना उन्हाळ्यात ताडगोळा खाल्ल्याने थकवा कमी होतो आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते.
ताडगोळा खाल्ल्याने शरीरातील अंतर्गत उष्णता संतुलित राहते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे यांसारख्या समस्या दूर होतात.
ताडगोळा उष्णतेच्या पुरळांवर, खाज येण्यावर आणि त्वचेवरील इरिटेशनवर आराम देतो. ते चेहऱ्यावर थेट लावले तरी उपयोग होतो.