Dhanshri Shintre
द्राक्षे त्यांच्या गोडसर, रसाळ चवेमुळे सर्वाधिक लोकप्रिय फळांपैकी एक मानली जातात आणि अनेकांच्या आवडीचं फळ आहे.
बाजारात वेगवेगळ्या रंगांची, गोल, अंडाकृती आणि लांबट अशा प्रकारांची द्राक्षे सहज पाहायला मिळतात.
उन्हाळ्यात द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते, म्हणूनच ती लोक आवर्जून खातात.
अशा वेळी अनेकांना संभ्रम वाटतो की कोणती द्राक्षे अधिक गोड आणि खरेदीसाठी योग्य आहेत. चला जाणून घेऊ.
हिरवट-पिवळसर रंगाची आणि लांबट आकाराची ही द्राक्षे असामान्य गोडसर चव देणारी असल्याने खूप लोकप्रिय आहेत.
लालसर आणि लांबट आकाराच्या या द्राक्षांना मधासारखी गोडसर, सौम्य आंबटसर चव असते, जी खूपच रुचकर वाटते.
ह्या लांबट, पातळसर द्राक्षांना जांभळट-तपकिरी रंग असतो आणि त्या प्रजातीचा वापर मनुका तयार करण्यासाठी होतो.
उष्ण हवामान आणि सुपीक जमिनीत वाढलेली द्राक्षे अधिक लांबट होत असून त्यांची गोडीही तुलनेत अधिक असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.