ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाला म्हटल्यावर आंब्याचा सीझन सुरु झाला आहे.
आंब्यामध्ये हापूस आंबा हा सर्वांनाच खूप आवडतो. चवीला अंत्यत गोड असा हापूस आंबा असतो.
बाजारात अनेक प्रकारचे आंबे आहेत. परंतु हापूस आंबा कसा ओळखायचा हे अनेकदा समजत नाही.
हापूस आंबा हा फक्त कोकणातच पिकतो.
अस्सल हापूस आंब्याला नैसर्गिक सुगंध असतो. हा सुंगध तुम्ही खूप दूरवर येतो. यावरुन तुम्ही आंबा ओळखू शकतात.
नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे हे मऊ असतात. त्याचा रंग थोडासा हिरवा असतो.
रासायनिकरित्या पिकवलेले आंबे हे जास्त खूप जास्त पिवळे असतात.
हापूस आंब्याची साल अगदी सहजरित्या आपण काढू शकतो. या सालीला आंब्याचा आतील गर चिकटत नाही.