Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कैरीचं पन्हं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनेकजण कडाक्याच्या उन्हात एक ग्लास कैरीचं पन्ह पितात.
कैरीचं पन्हं तुम्ही घरी देखील सोप्या पद्धतीने बनवू शकता. कैरी पन्ह चवदार लागते.
कैरी पन्ह बनवण्यासाठी सर्वातआधी कैरी, गूळ किंवा साखर, वेलची, जायफळ, जिरा पावडर, काळे मीठ, पुदीन्याची पाने हे साहित्य एकत्र करा.raw manog
कैरी पन्ह बनवताना गॅसवर कुकरमध्ये कैरी शिजवून घ्यायच्या आहेत.
कैरी शिजल्यानंतर त्यात तुम्ही गूळ किंवा साखर मिक्स करा. गूळ टाकल्याने पन्हाला नैसर्गिक चव येते.
नंतर त्यात तुम्ही वेलची आणि जायफळ पावडर टाका. यामुळे पन्हाला सुंगध येतो. मन प्रसन्न होते.
कैरीच्या पन्हात जिरे टाकल्याने पचनक्रिया सुधारते त्याची चव आणखी वाढते.
कैरीच्या पन्हात तुम्ही काळे मीठ आणि ४ ते ५ पुदिन्याची पाने मिक्स करा म्हणजे घरच्या घरी कैरी पन्ह तयार होईल.