Homemade Lassi Recipe: घरच्या घरी थंडगार लस्सी कशी बनवायची? वाचा ही सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

उन्हाळा

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा मिळण्यासाठी थंड पदार्थाचे सेवन केले जाते. दही, लस्सी, ताक, फळांचे ज्यूस याचे सेवन केले जाते.

Summer | Pintrest

लस्सी रेसिपी

लस्सी हे अनेकांचे आवडते पेय आहे. आता तुम्ही घरच्याघरी लस्सी बनवू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे.

Lassi Recipe | Pintrest

साहित्य एकत्र करा

लस्सी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ताजे दही, साखर, वेलची पावडर, बर्फ, मलई आणि ड्रायफ्रुट्स आहे.

Ingradiants | Pintrest

दही चांगले घोटून घ्या

सर्वातआधी एका भांड्यात दही आणि साखर हे मिश्रण एकत्रित करा. दही चांगले घोटून घ्या. नंतर या मिश्रणात वेलची पावडर मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.

Curd | Pintrest

बर्फाचे खडे घाला

साखर पूर्ण विरघळ्यानंतर यात बर्फाचे खडे मिक्स करा. लस्सी ग्लासमध्ये ओता आणि त्यावर दूध मलई टाका.

Ice | Pintrest

ड्रायफ्रुट्स मिक्स करा

तयार लस्सीमध्ये शेवटी ड्रायफ्रुट्स बारीक करून टाका आणि फ्रिजमध्ये लस्सी थंड करायला ठेवा. अशा प्रकारे घरच्या घरी थंडगार लस्सी तयार होईल.

Dryfruits Mix | Pintrest

next: Dryfruits Benefits For Hair Growth: आता केस गळतीला करा बाय बाय, दररोज खा हे 7 ड्रायफ्रुट्स, केस होतील दाट आणि काळेभोर

येथे क्लिक करा...