Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीरासाठी थंडगार अनेक पेय प्यायली जातात. ऊसाचा रस, मॅन्गो ज्यूस, कोमक सरबत हे रस प्रामुख्याने पितात.
उन्हाळ्यात नारळपाणी देखील पितात. नारळपाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
मात्र तुम्ही कधी नारळ मिल्कशेक प्यायला आहे का? आज आम्ही तुम्हाला घरगुती नारळ मिल्कशेक कसा बनवायचा? हे सांगणार आहोत.
नारळ मिल्कशेक बनवण्यासाठी ताजे नारळ घ्या त्यातील पाणी प्या आणि नारळाची मलई मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
मलई मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर त्यात साखर मिक्स करा. तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे असतील तर ते देखील तुम्ही मिक्स करू शकता.
त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण नारळमध्ये मिक्स करा त्यात थंड दूध आणि वेलची पावडर मिक्स करा. त्यामुळे मिल्कशेकला चव येईल.
मिल्कशेकमध्ये थंड होण्यासाठी त्यात तुम्ही बर्फ किंवा व्हॅनिला आईस्क्रिम मिक्स करा. अशाप्रकारे थंडगार नारळाचा मिल्कशेक घरच्या घरी तयार होईल.