Kairicha Thalipeeth: आंबट कैरीचं कुरकुरीत थालीपीठ; उन्हाळ्यातील स्पेशल रेसिपी, वाचा

Sakshi Sunil Jadhav

कैरीचं थालीपीठ रेसिपी

कैरी उन्हाळ्यात सगळ्यांच्याच घरात पाहायला मिळते. नुसती कैरी खाण्यापेक्षा तुम्ही तिचा वापर करुन कुरकुरीत आणि खमंग थालीपीठ तयार करु शकता.

Kairicha Thalipeeth Recipe

साहित्य

किसलेली कच्ची कैरी १ कप, ज्वारी पीठ १ कप, बेसन ½ कप, तांदूळ पीठ ¼ कप, हिरवी मिरची २ (बारीक), कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे, तीळ.

Kairicha Thalipeeth Recipe

कैरीची तयार करा

कच्ची कैरी सोलून बारीक किसून घ्या. त्यामुळे चव छान आंबटसर येते.

Kairicha Thalipeeth Recipe

पीठ एकत्र करा

एका भांड्यात ज्वारी पीठ, बेसन आणि तांदूळ पीठ एकत्र मिक्स करुन घ्या.

Kairicha Thalipeeth Recipe

मसाले घाला

आता त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, जिरं, तीळ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Kairicha Thalipeeth Recipe

कैरी मिक्स करा

आता किसलेली कैरी घालून सगळं मिश्रण एकत्र करुन घ्या.

crispy thalipeeth recipe

पीठ मळा

थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. जास्त पाण्याच्या वापर करु नका.

crispy thalipeeth recipe

थालीपीठ थापा

केळीच्या पानावर किंवा प्लास्टिकवर हाताने थापून मधोमध छोटी छिद्र करा.

crispy thalipeeth recipe

शेकण्याची सोपी पद्धत

तवा गरम करून थोडं तेल सोडा आणि थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.

crispy thalipeeth recipe

सर्व्ह करा

गरमागरम कैरीचं थालीपीठ लोणी, दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

crispy thalipeeth recipe

NEXT: बाथरूममध्ये वॉशिंग मशीन चालू असताना तुम्हीसुद्धा आंघोळ करता? मृत्यू होण्याचा धोका, नेमकं कारण काय?

shock risk wet conditions
येथे क्लिक करा